maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


अपघातात जखमी झालेल्या एकाचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सातारा : अपघातात जखमी झालेल्या एकाचा सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विमल बाजीराव भोसले, वय ७६, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दि. ११ रोजी मृत्यू झाल्याची खबर डॉ. ननावरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.