maharashtra

बसमध्ये चढताना महिलेचे दागिने लंपास


फलटण शहर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. दि. १३ रोजी हि घटना घडली.

सातारा : फलटण शहर येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. दि. १३ रोजी हि घटना घडली.

पुष्पा मधुकर दुरगुडे (वय ४७, रा. शिरसणे, ता. बारामती, जि.  पुणे) यांनी फिर्याद दिली. त्या फलटण येथून डिस्कळ गावी आपल्या मुलीकडे निघाल्या होत्या. सोबत मुलीचे बाळ लहान असल्याने त्या गर्दीत आधी जागा धरण्यासाठी चढण्याचा प्रयत्न करत असताना चोरट्याने डाव साधला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवलदार वीरकर करत आहेत.