महिलांचा बचत गट तयार करून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून कर्जाचे दीड लाख रुपये हडप केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : महिलांचा बचत गट तयार करून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून कर्जाचे दीड लाख रुपये हडप केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा दीपक मोहिते (वय ४०, रा. सिद्धार्थ हौसिंग सोसायटी मंगळवार पेठ, फलटण ) यांनी फिर्याद दिली. पप्पू उर्फ पवन लोभाजी भोसले (रा. सिद्धार्थ सोसायटी, मंगळवार पेठ, फलटण ), दीपक बाळासाहेब सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण ), उमेश हरिचंद्र गायकवाड (रा. सस्तेवाडी), नईम मेटकरी (रा. ) साखरवाडी), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. ९ ऑगस्ट २०१८ पासून मोहिते यांच्यासह प्रिया मयूर मोरे, शुभांगी सचिन काकडे, रेश्मा चंद्रकांत मोहिते, तनुजा मछिंद्र हरिहर यांचा गट तयार करून त्यांना अजित मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी, साखरवाडी शाखेतून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज काढून देतो असे सांगून पप्पू याने महिलांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व तीन चेक घेऊन प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज असे दीड लाख रुपये महिलांना न देता चौघांनी परस्पर हडपले. तपास हवालदार फरांदे करत आहेत.


