maharashtra

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात फलटणच्या कैद्याचा मृत्यू


कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.

सातारा : कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बाललैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असणाऱ्या फलटण, ता. फलटण येथील कुरेशी नगर मधील आझम कासम शेख, वय ५४ याचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आझम शेख याला पोलिसांनी दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली होती. सातारा येथील न्यायालयाने त्याला २३ फेब्रुवारी २०२२ रोजी १० वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली होती. दि. ९ मार्च २०२२ रोजी आझम शेख याला कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात स्थलांतरित केले होते. अशक्तपणा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्याला दि. १२ रोजी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.