maharashtra

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा


सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व बहिणीच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस सातारा ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व बहिणीच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस सातारा ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१७ रोजी २ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात वास्तव्य करणारी महिला व तिचा पती नवीन शेडच्या ठिकाणी उभे होते. त्यावेळी तेथे महेश अशोक शिवदास, रा. सातारा हा तिथे आला त्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. योगेश गणेश शिवदास, रा. सातारा याने त्या महिलेच्या पतीस मारहाण केली. त्यावेळी महिलेच्या बहिणीचा मुलगा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.