maharashtra

फलटण तालुक्यातील गिरवी मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न

दिगंबर आगवणेच्या पत्नीसह पाच जणांचा सहभाग

फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : फलटण तालुक्यातील गिरवी मधील स्वराज बंगल्याच्या खोल्यांची कुलपे तोडून पाच जणांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दिगंबर रोहिदास आगवणे रा. गिरवी तालुका फलटण हे मागील काही दिवसांपासून फसवणुकीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असल्यामुळे दि. 9 नोव्हेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान त्यांची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे, स्नेहल रवींद्र बनसोडे, काकासो आगवणे, हिम्मत निकाळजे, धनंजय आगवणे सर्व रा. गिरवी, तालुका फलटण यांनी दिगंबर आगवणे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मदत होईल अशा अथवा त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरात येऊ शकतात अशा वस्तू किंवा कागदपत्रांची चोरी करण्याच्या उद्देशाने फलटण तालुक्यातील गिरवी मध्ये असणाऱ्या स्वराज बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून बंगल्यातील वस्तू किंवा कागदपत्रांची चोरी करण्यासाठी प्रयत्न केला असावा, अशा आशयाची फिर्याद किरण शंकर डुकरे रा. भडकमकर नगर, फलटण, ता. फलटण यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करीत आहेत.