maharashtra

जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न


जुन्या भांडणाच्या कारणातून कोंडवे, ता. सातारा येथे गळा दाबून एकाला मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून कोंडवे, ता. सातारा येथे गळा दाबून एकाला मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास कोंडवे येथील नलवडे अळीतून तेथीलच संजयकुमार चंद्रकांत निंबाळकर गाडीवर जात असताना जुन्या भांडणाच्या कारणातून विक्रम सिंह उर्फ विकास रामचंद्र निंबाळकर यांनी त्यांचा रस्ता अडवत मी तुला सोडणार नाही असे म्हणत त्यांना धक्काबुक्की करून त्यांचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.