सरताळे, ता. जावली येथील एका युवकाचा मृतदेह वाढे गावच्या हद्दीत काल सापडला होता. त्या युवकाच्या मृत्यूच्या तपासाची मागणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय वसंत साळुंखे, रा. सरताळे यांनी केली आहे.
सातारा : सरताळे, ता. जावली येथील एका युवकाचा मृतदेह वाढे गावच्या हद्दीत काल सापडला होता. त्या युवकाच्या मृत्यूच्या तपासाची मागणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय वसंत साळुंखे, रा. सरताळे यांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ जानेवारी रोजी ६ वाजण्यापूर्वी वाढे, ता. सातारा येथील हॉटेल अमर शेजारील पुलाजवळ निलेश मोहन साळुंखे, वय ३०, रा. सरताळे, ता. जावली याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मृत्यूचा तपास करावा अशी मागणी संजय वसंत साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याकडे केली आहे.


