Satara

esahas.com

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

केंद्र शासनाने स्थानिक डेअरी व कृषी उत्पादनांवर पाच टक्के जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे या धोरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी धरणे आंदोलन केले.

esahas.com

जिलेटिन कांड्यांचे मूळ शोधण्याचे कराड पोलिसांसमोर आव्हान

कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांद्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती. कराड पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळीच त्यांचा हा कट उधळून लावला.

esahas.com

पाटखळचा ग्रामसेवक चार हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात

पाटखळ, ता. सातारा ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख, वय ५१, रा. शाहूपुरी हे ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.

esahas.com

सातारा येथे तृतीयपंथियांचा मोर्चा

विविध मागण्यासाठी तृतीयपंथियांनी सातारा येथील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस मुख्यालय कार्यालयाबाहेर आक्रोश मोर्चा काढून तृतीयपंथियांवर अन्याय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

esahas.com

जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांची निदर्शने

जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांनी निदर्शने केली.

esahas.com

सातारा जिल्हा बँकेच्या वतीने यशोधन अनाथ आश्रमास आर्थिक मदत !

मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावच्या हाद्दीतील ’यशोधन अनाथ आश्रम’ रवि बोडके या फलटण तालुक्यातील माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील कर्तृत्व भारारून टाकणारे आहे.

esahas.com

पुरुषोत्तम जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

उद्योजक आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला सुरुंग लागल्याचे मानण्यात येते.

esahas.com

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् नागरिकांनी दिला चोप

गुरुवारी दुपारी पोवई नाक्यावरील शिक्षक बँकेसमोर दोन युवक पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी युवकांना चोप दिला. युवकांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

esahas.com

ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

गजवडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.

esahas.com

नगर वाचनालय परिसरात आढळला मृतदेह

राजवाडा येथील नगर वाचनालय परिसरात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पसरल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना सांगण्यात आले.