गजवडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
सातारा : गजवडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणार्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
परळी ते आंबळे पो.कारी रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या झालेल्या अपघातात अशोक तुकाराम पवार (वय 50, रा. आंबळी पो.कारी) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर पाठिमागे बसलेला इसमही जखमी झाला आहे. अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली असूप ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.


