Satara

esahas.com

सराईत दुचाकी चोरट्याला डीबी पथकाने सापळा रचून केली अटक

शहर व परिसरातून दुचाकी चोरणार्‍या सराईत चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) सापळा रचून अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.

esahas.com

गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीनेच दिला नातीचा नरबळी

गुप्तधनाच्या हव्यासापोटी चार वर्षांपूर्वी पाटण तालुक्यात एका मुलीचा खून झाल्याची थरकाप उडविणारी घडना घडली होती. या खुनाचा उलगडा करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी या मुलीच्या आजीसहीत चारजणांना अटक करण्यात आली आहे.

esahas.com

बकासुर गँग मधील 7 जण तडीपार

सातार्‍यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासूर गँगमधील सात जणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून पंचवीशीच्या आतील युवक आहेत.

esahas.com

कष्टकरी व शेतकऱ्यांचे नेते साजिद मुल्ला यांचे निधन

बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

esahas.com

सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणी योजना

सातारा शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता शहराबरोबर हद्द वाढीची जबाबदारी सातारा पालिकेवर आली आहे. यंदा कास धरणाची उंची वाढल्याने सातारकरांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. येत्या वर्षभरात सातारकरांसाठी चोवीस बाय सात पाणीयोजना राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

esahas.com

वाचन संस्कृती वाढवणारी उपक्रमशील ग्रंथालये हवीत

वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारी उपक्रमशील ग्रंथालये ही काळाची गरज आहे. उपक्रमशील ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कार द्यावा, असे आवाहन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या येथील कन्याशाळा शालेय समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी थोरात यांनी केले.

esahas.com

वाढे फाटा येथे वाहतूक पोलिसांनी जेसीबीद्वारे बुजवले खड्डे

सातारा शहरातील वाढे फाटा येथे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड बनले होते. खड्ड्यांमुळे अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता झाल्याने अखेर वाहतूक (ट्रॅफिक) पोलिसांनी जेसीबीद्वारे खड्डे बुजवले.

esahas.com

सातारा येथील सराफ व्यावसायिकाची बारा लाख रुपयांची फसवणूक

येथील एका सराफ व्यवसायिकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

esahas.com

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 40 किलो प्लास्टिक जप्त

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सिंगल युज प्लास्टिक बंदीची कारवाई नेटाने पुढे चालवली आहे. दररोज सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दुकानांची तपासणी करण्याच्या मोहिमेमुळे व्यापारी आणि दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले.

esahas.com

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख

तंबाखूच्या व्यसनामुळे युवा पिढी उध्वस्त होत असून शारीरिक, आर्थिक, सामाजिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली असून हे थांबवण्यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.