maharashtra

कष्टकरी व शेतकऱ्यांचे नेते साजिद मुल्ला यांचे निधन


Death of Sajid Mulla, leader of laborers and farmers
बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कराड : बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कराड तालुक्यातील गोवारे येथील राहणाऱ्या साजिद मुल्ला यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेकवेळा धरणे आंदोलन, आमरण उपोषण, रास्तारोको, मोर्चा आदी लोकशाही मार्गाने लढा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या माध्यमातून राज्यभर करण्यात आलेल्या ऊसदराच्या आंदोलनात साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये साजिद मुल्ला यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही नोंद होते. मुल्ला यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. दरम्यान, साजिद मुल्ला यांची आज प्राणज्योत मालवली. त्यामुळे शेतकरी चळवळीतील एक संघर्ष करणारा आवाज हरपला. साजिद मुल्ला यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.