बकासुर गँग मधील 7 जण तडीपार
सातारा पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई; आतापर्यंत 146 जण तडीपार
सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासूर गँगमधील सात जणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून पंचवीशीच्या आतील युवक आहेत.
सातारा : सातार्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासूर गँगमधील सात जणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून पंचवीशीच्या आतील युवक आहेत.
शाहुपुरी, सातारा शहर, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, अनाधिकाराने प्रवेश करुन मारहाण करणे, अवैध शस्त्रांचा वापर करुन धमकावणे, गर्दी मारामारी करणे अवैध मटका जुगार चालविणे असे शरीराविरुध्दचे व मालमत्ते विरुध्दचे गंभीर गुन्हे करणार्या टोळीचा प्रमुख 1) यश नरेश जांभळे, वय 21 वर्षे, रा.झेडपी कॉलनी, शाहुपुरी, ता. जि. सातारा. 2) आदित्य जयेंद्र गोसावी, वय -21 वर्षे ( टोळी सदस्य) रा.66 शुक्रवारपेठ सातारा, जि. सातारा, 3) विशाल राजेंद्र सावंत, वय 20 वर्षे (टोळी सदस्य) रा. 501, मंगळवारपेठ, सातारा, 4) साहील जमीर जमादार, वय 21 वर्षे (टोळी सदस्य), रा. 252, बुधवारपेठ, सातारा, 5) ऋतिक ऊर्फ विजय विनोद कांबळे, वय 23 वर्षे, (टोळी सदस्य) रा. 263, बुधवारनाका, सातारा, 6) प्रज्वल प्रविण गायकवाड, वय 24 वर्षे, (टोळी सदस्य) रा. अंजली कॉलनी, शाहुपूरी, सातारा, 7) शिवम संतोष पुरीगोसावी, वय 18 वर्षे, (टोळी सदस्य), रा. गडकर आळी, गोसावीवाडा, सातारा यातील यश जांभळे हा टोळीप्रमुख असून संशयितांचा बकासूर नावाचा ग्रुप आहे. यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. बी. निंबाळकर यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होवुन या टोळीस अजय कुमार बन्सल ख.झ.ड. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन एक वर्षे कालावधीचा हद्दपारीचा आदेश केला आहे.
वरील टोळीतील लोकांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याकरीता मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये म्हणुन त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.


