maharashtra

सराईत दुचाकी चोरट्याला डीबी पथकाने सापळा रचून केली अटक

संशयितांकडून पोलिसांनी केल्या 4 दुचाकी जप्त

The DB team laid a trap and arrested the two-wheeler thief in the inn
शहर व परिसरातून दुचाकी चोरणार्‍या सराईत चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) सापळा रचून अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.

सातारा : शहर व परिसरातून दुचाकी चोरणार्‍या सराईत चोरट्याला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) सापळा रचून अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
अभिजित भरत पवार (वय 28, रा. शेरेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात सातत्याने दुचाकी चोरीस जात होत्या. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवण्यास सुरूवात केली. त्यावेळी अभिजित पवार याच्यावर पाळत ठेवून पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सातारा शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
या दुचाकी त्याने वापरून पुन्हा सोडून दिल्याचे सांगितले. त्या दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्याच्यावर कोरेगाव, पुसेगाव आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे फौजदार सुधीर मोरे, पोलिस हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, गणेश भोंग, सागर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.