maharashtra

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 40 किलो प्लास्टिक जप्त

राजवाडा परिसरातील 35 दुकानांची तपासणी

40 kg of plastic seized by health department of Satara municipality
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सिंगल युज प्लास्टिक बंदीची कारवाई नेटाने पुढे चालवली आहे. दररोज सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दुकानांची तपासणी करण्याच्या मोहिमेमुळे व्यापारी आणि दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले.

सातारा : सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने सिंगल युज प्लास्टिक बंदीची कारवाई नेटाने पुढे चालवली आहे. दररोज सातारा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन दुकानांची तपासणी करण्याच्या मोहिमेमुळे व्यापारी आणि दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राजवाडा परिसरात 35 दुकानांची तपासणी करून चाळीस किलो प्लास्टिक जप्त केले. या संदर्भात आरोग्य विभागाचे मुख्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी यासंदर्भात ही मोहीम पुढे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याचे प्रदूषण टाळण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना सिंगल युज प्लास्टिक बंदी जाहीर करून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सातारा पालिकेने गेल्या चार दिवसांमध्ये सातत्याने कारवाई करून सुमारे 100 किलो पेक्षा अधिक प्लास्टिक जप्त केले आहे.
मंगळवारी सायंकाळी चारच्या नंतर आरोग्य विभागाने पुन्हा राजवाडा परिसरातील दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, मुकादम संदीप पाठपुते, तुकाराम खंडजोडे, आकाश आवळे, कपिल व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.