maharashtra

वाढे फाटा येथे वाहतूक पोलिसांनी जेसीबीद्वारे बुजवले खड्डे


Potholes filled by JCB by traffic police at Vaadhe Phata
सातारा शहरातील वाढे फाटा येथे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड बनले होते. खड्ड्यांमुळे अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता झाल्याने अखेर वाहतूक (ट्रॅफिक) पोलिसांनी जेसीबीद्वारे खड्डे बुजवले.

सातारा : सातारा शहरातील वाढे फाटा येथे रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे अवघड बनले होते. खड्ड्यांमुळे अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता झाल्याने अखेर वाहतूक (ट्रॅफिक) पोलिसांनी जेसीबीद्वारे खड्डे बुजवले.
बुधवारी दुपारी सपोनि विठ्ठल शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलिस खुडे, इंगुळकर, महेश बनकर, किशोर वायदंडे, सुतार, जयवंत बुधावले, वाघमळे यांनी वाढे फाट्यावर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी जेसीबी बोलावला. सुमारे एक तासभर त्याद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. पोलिसच खड्डे बुजवत असल्याचे पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. गेली महिनाभर पावसामुळे वाढे फाट्यावरील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दुचाकीस्ववारांना परिसरातून जीवावर उदार होवून जावे लागत आहे. रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने अनेकजण जायबंदी झाले आहेत.