सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते.
फलटण ग्रामीण पोलीसानी साखरवाडी येथे छापा टाकून अवैध गांजा विक्री करणाऱ्या चंदाबाई बाळू जाधव या संशयित महिलेस 61 हजार 500 रुपये किमतीच्या गांजासह अटक केली आहे.
शेतीअवजारे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उद्या आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरही जीएसटी लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब हेच का आपले अच्छे दिन ! असा थेट सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निवेदनाद्वारे केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण जाहीर केल्यामुळे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने येथील पोवई नाका येथे साखर आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
दांडेघर, ता. महाबळेश्वर येथील डोंगराला अतिवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे डोंगराशेजारी असणाऱ्या एका शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर रोटर फिरवून भाजपशी घरोबा केल्यानंतर उणेपुरे पंधरा दिवस उलटतात न उलटतात तोच जिल्हा राष्ट्रवादीतील कद्दावर नेते समजले जाणार्या सभापतींनी आज कोरेगाव उत्तर मध्ये कार्यकर्त्यांचा सिक्रेट मेळावा घेवून भाजपात जावून आपले पद वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
सातारा येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या एका भंगाराच्या दुकानात तीन ट्रक पॅकपीस व्हील चेअर भंगारात आल्याची माहिती समजताच आज शहर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, दिव्यांग बांधवांनी पोलीस अधीक्षक अजय बंन्सल यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात इम्पिरीकल डेटा केंद्र शासनाने द्यावयाचा आहे, असे सांगण्यात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष घालवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा त्यांचा डाव होता. विशेषतः यामध्ये महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आघाडीवर होता, अशी घणाघाती टीका आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली.
झोपडपट्टी वसाहतीमधील निम्न श्रेणीचे जीवन जगणाऱ्या गरिबांचा कायापालट करण्याची काही जणांची भाषा हे त्यांचे खरे प्रेम नसून हा ढोंगीपणा आहे. मगरीचे अश्रू आहेत त्यांचे हे नवीन ढोंग माजगावकर माळ काय साताऱ्यातील सर्वच झोपडपट्टी सदृश्य वसाहतीमधील नागरिकांनी ओळखली आहे अशी खरमरी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली आहे
अंजली कॉलनीमधील बांधकामावरून पत्र्याच्या शेडमधून सेंट्रींगच्या प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली आहे.