maharashtra

तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तडीपार गुंडास अटक

सातारा शहर पोलिसांची कारवाई

Tadipar gangster arrested for violating Tadipar order
सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते.

सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मालमत्ते विरुद्ध व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील सराईत इसम अक्षय संभाजी आढाव वय 21 वर्षे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यास उपविभागीय दंडाधिकारी सातारा भाग सातारा यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष या कालावधी करता हद्दपार केले होते.
तरी देखील तो माहूली गावच्या परिसरात येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यास पकडण्याकरिता ठिकठिकाणी पोलीस वॉचवर थांबून होते. रात्रीच्या 11.00 वाजण्याच्या सुमारास सदरचा गुंड छुप्या पद्धतीने येत असताना दिसून आला. त्यास पोलिसांनी ओळखून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागताना पोलिसांनी त्यास जागीच पकडले व त्यास अटक करून त्याच्या विरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद केलेला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, अभय साबळे, सागर गायकवाड, संतोष कचरे, गणेश भोंग, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.