maharashtra

सेंट्रींगच्या प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना अटक


Two people were arrested in connection with the theft of centering plates
अंजली कॉलनीमधील बांधकामावरून पत्र्याच्या शेडमधून सेंट्रींगच्या प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली आहे.

सातारा : अंजली कॉलनीमधील बांधकामावरून पत्र्याच्या शेडमधून सेंट्रींगच्या प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली आहे.
अनिकेत ऊर्फ आण्णा अर्जुन पिटेकर (वय 19, रा. बेलवडे, ता. कराड, सध्या रा. ऐक्य प्रेस कॉर्नर, नामदेववाडी झोपडपट्टी), प्रशांत आण्णा खवले (वय 19 रा. ऐक्य प्रेस कॉर्नर, नामदेववाडी झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी सेट्रींगच्या प्लेटा चोरीबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार यांनी एका संशयिताचे नाव शाहूपुरी पोलिसांना सांगितले होते. त्यावरुन पोलिस संशयितांची माहिती घेत असतानाच त्यांची माहिती मिळाली पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून संशयितांना ताब्यात घेवून चौकशी करताच चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीचा 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोनिसंजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार यांनी ही कारवाई केली आहे.