सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण जाहीर केल्यामुळे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने येथील पोवई नाका येथे साखर आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण जाहीर केल्यामुळे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने येथील पोवई नाका येथे साखर आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून लढा सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी घटकाला आरक्षण जाहीर केल्यामुळे आज संघटनेच्या वतीने पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय पोतदार म्हणाले, ओबीसी घटकाला न्याय मिळावा यासाठी ओबीसी बंधू गेल्या दीड वर्षापासून लढा देत आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान सरकारने योग्य भूमिका घेतल्यामुळे ओबीसी घटकाला न्याय मिळण्यास मदत झाली.


