maharashtra

उद्या आपल्या श्वासावरही जीएसटी लागला तर आश्चर्य नको

रमेश उबाळे : हेच काय ते अच्छे दिन; पंतप्रधान मोदींना पाठविले निवेदन

Don't be surprised if your breath gets GST tomorrow
शेतीअवजारे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उद्या आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरही जीएसटी लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब हेच का आपले अच्छे दिन ! असा थेट सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निवेदनाद्वारे केला आहे.

पुसेगाव : शेतीअवजारे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. उद्या आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासावरही जीएसटी लागल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाहेब हेच का आपले अच्छे दिन ! असा थेट सवाल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र वजा निवेदनाद्वारे केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रमेश उबाळे यांनी हे निवेदन पाठविले आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपण केलेल्या घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल महाग आपण केला. परंतु शेती अवजार, शेतमाल तसेच जीवनावश्यक   वस्तूंवर जीएसटी लावल्याने सर्वसामन्याचे कंबरडे मोडले आहे. आपण सत्तेवर आल्यानंतर ग्रामीण भागातील महिलेला यापुढे चूल फुकला लागणार नाही अशा जाहिराती टीव्हीवर झळकल्या. परंतु गॅस महाग झाल्याने पुन्हा वृक्षतोड वाढली आहे तसेच चुलीसाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी महिलांना पुन्हा सरपण गोळा करण्यासाठी रानावनात जावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत चालल्याने उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्ष प्रश्न सर्वसामान्याना भेडसावत आहे.  आम्ही वेगळ्या पक्षात  असलो तरी पंतप्रधान मोदी साहेब आपण २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर  खरोखरच अच्छे दिन येतील आम्हाला वाटले होते परंतु सध्याची परिस्थिती पाहता हेच का आपले अच्छे दिन! असा प्रश्न आम्हाला पडत असल्याने मोठे धाडस करून कळजावर दगड ठेऊन आपणांस हे निवेदन पाठवत आहे. असे बोलताना उबाळे यावेळी म्हणाले.
कोरोना काळात बहुसंख्य नागरिकांनी आपली नोकरी, रोजगार गमावला आहे. अनेकांचे उद्दोगधंदे बंद पडले आहेत. या सर्व बाबी पूर्ववत होण्यासाठी बराच कालावधी लागेल असे असताना आपण दररोज लोकांना आवश्यक असणाऱ्या किराणा मालावरही पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जाहीर केला हे पाहता भविष्यात आपण आम्हाला जगण्यासाठी तसेच श्वास घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनवरही जीएसटी  लावणे बाकी आहे. असे वाटते. मोदींसाहेब आपण याबाबत गांभीर्याने विचार करावा  अच्छे दिनचे स्वप्न दाखवून आपण सत्तेवर आला आहात तर घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून शेती अवजारे, शोतीमाल तसेच किराणामलाव लावलेला जीएसटी रद्द करून सर्वसमान्याना दिलासा द्यावा हीच आमची माफक अपेक्षा आहे.

भाजपच्या एका तरी नेत्याची ईडी चौकशी लावा
केंद्र शासनाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी करण्यात आली  मग भाजपचे नेते काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? त्यांच्या एका तरी नेत्याची ईडी चौकशी का होत नाही असा सवालही रमेश उबाळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.