Satara

esahas.com

कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कोरेगाव येथील महसूल कारकुनाला ३ वर्ष सक्तमजुरी

कोरेगाव, ता. कोरेगाव येथील तहसील कार्यालयातील महसूल कारकुन प्रवीण रघुनाथ कुंभार याने दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी त्याला न्यायालयाने ३ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

esahas.com

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

कोयना परिसरात मागच्या काही दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. दरम्यान आज दुपारी (दि. 22) 1 वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल होती. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

esahas.com

कास पठारावर हवाई पट्टी उभारण्याची खासदार उदयनराजे यांची मागणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार येथे महाराष्ट्रातील 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.

esahas.com

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत; आलेच तर तेव्हा पाहू : आ. जयकुमार गोरे

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने सातारा जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. या पार्श्‍वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष व आ. जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता सत्ता नसली काही लोकांची अवस्था पाण्याविना मासा जसा तडफडतो तशी होते. त्यांच्या प्रवेशाबाबत मला काही कल्पना नाही. मात्र जर आलेच तर तेव्हा पाहू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

esahas.com

झटपट वजन कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर! जाणून घ्या खाण्याची पद्धत

खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खरंतर ड्रायफ्रूट्स हे आरोग्याच्या दृष्टीने कितीही फायदेशीर असले तरी ते प्रत्येकालाच आवडत नाहीत. याच ड्रायफ्रूट्समधील खजूर हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. खजूर (Dates) खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. खजूरचे तसे अनेक फायदे आहेत. पण, सर्वात महत्वाचं म्हणजे खजूर खाल्ल्याने वजन कमी होते. मात्र, खजूर खाण्याची योग्य वेळ आणि खजूर कसे खायचे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. खजूरमध्ये आहारातील फायबर, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे पोषक घटक वजन कमी करण्यात खूप मदत करता

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा

एका मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

जिल्ह्यात दोन दारू अड्डयावर छापे

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

esahas.com

कुडाळी नदीत बुडून महिलेचा मृत्यू

उडतारे, ता. वाई परिसरात असणाऱ्या कुडाळी नदीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जैतापुर येथून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी

जैतापुर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.