maharashtra

कुडाळी नदीत बुडून महिलेचा मृत्यू


Woman dies after drowning in Kudali river
उडतारे, ता. वाई परिसरात असणाऱ्या कुडाळी नदीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : उडतारे, ता. वाई परिसरात असणाऱ्या कुडाळी नदीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२० जुलै रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उडतारे येथील सौ. सुशीला दत्तात्रय गुजर, वय ७२ यांचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर महेंद्र दत्तात्रय गुजर यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.