कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सतीश सुरेश गायकवाड, वय ५०, रा. तरडगाव, ता. फलटण यांनी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि.२१ जुलै रोजी मृत्यू झाल्याची खबर लक्ष्मण परमेश्वर गायकवाड यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली.