जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई, ता. वाई गावच्या हद्दीत चित्रा टॉकीज समोर मारुती सखाराम सणस, रा. आसरे, ता. वाई याच्याकडून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपये किमतीच्या ३५ देशी विदेशी दारूच्या बाटल्या, शिंगणापुर, ता. माण गावच्या हद्दीत पान टपरीच्या आडोशाला तेथीलच रघुनाथ अण्णा चव्हाण याच्याकडून ५४० रुपये किमतीच्या ९ देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.


