एका मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : एका मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१० जुलै रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास कृष्णानगर, सातारा येथील गेट नंबर दोन समोर माणिक लक्ष्मण चव्हाण, रा. प्रतापसिहनगर, सातारा हे बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून मजुरीचे काम करून आपल्या घरी पायी चालत जात असताना अज्ञात दुचाकी चालताना त्यांना धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि.१९ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची खबर प्रवीण अनंता चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.


