maharashtra

जैतापुर येथून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी


Theft of compensation worth Rs.54 thousand from Jaitapur
जैतापुर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : जैतापुर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ५४ हजार रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ ते दि.१६ जुलै दरम्यान जैतापुर येथील महेश रवींद्र इंगवले, वय २४ यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात इसमाने तोडून आत प्रवेश केला. घरामधील एक मोकळी व एक शेगडीला जोडलेली सिलेंडरची टाकी, तांब्याचा हंडा, कळशी देवपूजेचे तीन तांबे, पातेले, पितळेची समई असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.