maharashtra

नगर वाचनालय परिसरात आढळला मृतदेह


The body was found in the vicinity of the town library
राजवाडा येथील नगर वाचनालय परिसरात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पसरल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना सांगण्यात आले.

सातारा : राजवाडा येथील नगर वाचनालय परिसरात गुरुवारी सकाळी मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पसरल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना सांगण्यात आले.
सुरुवातीला त्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर प्रकाश उर्फ हणमंत लक्ष्मण आटाळे (वय 45) असे असल्याचे समजले. कुटुंबियांना याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह सिव्हीलमध्ये नेण्यात आला.