विविध मागण्यासाठी तृतीयपंथियांनी सातारा येथील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस मुख्यालय कार्यालयाबाहेर आक्रोश मोर्चा काढून तृतीयपंथियांवर अन्याय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
सातारा : विविध मागण्यासाठी तृतीयपंथियांनी सातारा येथील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस मुख्यालय कार्यालयाबाहेर आक्रोश मोर्चा काढून तृतीयपंथियांवर अन्याय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आमचे जबरदस्तीने लिंग परिवर्तन केले जाते. भर रस्त्यात आम्हाला मारहाण केली जाते. कराड येथील एक टोळी आम्हाला सातत्याने त्रास देत आहे. आमची घरे फोडली जात आहेत. कराड येथील एका टोळीतील १५ जणांनी तेथीलच एका तृतीय पंथाला बेदम मारहाण करून त्याच्या घरातून जबरदस्तीने दागिने पैसे चोरून नेहले आहेत. आम्हाला नाहकपणे सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होत असून संबंधित टोळीवर कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


