पाटखळ, ता. सातारा ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख, वय ५१, रा. शाहूपुरी हे ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.
सातारा : पाटखळ, ता. सातारा ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख, वय ५१, रा. शाहूपुरी हे ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पाटखळ येथे खड्डे काढून पाण्याचे लिकेज काढुन शौचालयाची टाकी साफ केलेल्या कामाचे बिल करण्यासाठी ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख यांनी तक्रारदार त्याच्याकडे ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने त्याची आज पडताळणी करून सापळा लावला असता तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक दीपक देशमुख अलगद जाळ्यात अडकले. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईत पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस नाईक ताटे, राजे, पोलीस कॉन्स्टेबल भोसले सहभागी झाले.


