निविष्ठा उत्पादन, विक्री व पुरवठा या बाबत सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी पुरेशा नसल्याचे सांगत राज्य सरकारने नवे कायदे करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
आज (8 सप्टेंबर) आणि उद्या (9 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी पतसंस्थेमध्ये 24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार करणाऱ्या सहा संचालकांना तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथून कारवाई करून अटक केली.
सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, जावली या तीन तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये दीडशे महिलांचे नाव शेत जमिनीच्या सातबार्यावर लागले आहे. लक्ष्मी मुक्ती अभियानांतर्गत ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, अशी क्रांतिकारी माहिती दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.
खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिजउगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील चाहुर येथील ऊमेश भोसले या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या शेतावर काम करणाऱ्या विवाहीत शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि आपल्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो. तरीही त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रात्री अपरात्री जंगली श्वापदांच्या हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
पाण्यातील शेतीपंप चोरी प्रकरणी एका संशयित युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून शेती पंपासह दुचाकी असा ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. अनिकेत दिपक वाघमारे (वय १८, रा. वरुड, ता. खटाव) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत साखर वाटून आपला आनंद साजरा केला. येथील सेव्हन स्टार चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार घोषणाबाजी केली.
भालवडी, ता. माण येथील शेतकर्यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले
शासकीय कृषी महाविद्यालय, कराड अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2020 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कराडच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदूत अभिजित लालासाहेब राऊत व सुजय शंकर घनवट यांनी माण तालुक्यात डंगिरेवाडी (मोही) या गावामध्ये शेतकर्यांना विविध पिकासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विविध इंटरनेट अॅपच्या माध्यमातून पिकावरील रोग किडी कशा ओळखाव्यात याची माहिती दिली.
गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.