शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.
पुसेगाव : शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून ते १ जुलै २०२२ या कालावधीत शासनाच्या वतीन कृषी संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जांब (ता.खटाव) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमित मदने, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रामपंचायत सदस्य रणजित शिंदे, उदय शिंदे, सयाजी शिंदे, रामचंद्र शिंदे, पोलिस पाटील,अमृत शिंदे, तुकाराम सोनावणे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मोहीमे अंतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. या व्यतिरिक्त या कालावधीत शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान,शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, तसेच सोयाबीन व घेवडा बीजप्रकियेपासून ते विक्रीपर्यंतचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मंडल कृषी अधिकारी सचिन लोंढे यांनी विकेल ते पिकेल, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार,प्रत्येक महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण उपाययोजना बाबत तसेच गावातील शेतीतील विविध पिकांचे उत्पादन वाढीसाठी नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे, साह्यक कृषी अधिकारी संतोष शिंदे, कुंडलिक जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाबासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साह्यक कृषी अधिकारी किरण काळे यांनी केले, तर आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.


