कृषि तंत्राची अंमलबजावणी ही काळाची गरज : जितकर
खटाव येथे तालुका कृषि अधिका-यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व बैठक संपन्न
खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिजउगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.
पुसेगाव : खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापूर्वी माती परिक्षण, बिजउगवण क्षमता चाचणी, बियाणे बदल, बिज प्रक्रिया व बी बी एफ द्वारे पेरणी या तंत्रज्ञानाच्या बाबींचा काटेकोरपणे वापर केल्यास उत्पानात ४० % नी वाढ होते असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी खटाव राहुल जितकर यांनी खटाव येथे खरीपहंगामपूर्व बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने खरीपहंगामापुर्व नियोजन बैठका, घोंगडी बैठकाच्या माध्यमातून कृषितंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविणे, उत्पादन खर्च कमी करणे, शेतक-यांचा आर्थिकस्तर उंचावणे या उद्देशाने नियोजन करणेत येत आहे. या प्रसंगी बोलताना राहुल जितकर म्हणाले की, “सोयाबिन, घेवडा उत्पादन वाढीसाठी बिजप्रक्रीया, बिजउगवण क्षमता चाचणी, माती परिक्षणाचे महत्व, बी बी एफ द्वारे पेरणी या विषयी सचिस्त मार्गदर्शन केले. यावेळी खटाव येथील पाणलोट समितीचे अध्यक्ष दिलीप जाधव प्रगतशील शेतकरी मुगुटराव पवार, मनोज विधाते, अभिजीत विधाते, राहुल काटकर, गणेश काळे यांचे समवेत कांदाचाळ, ऊस, बटाटा, कांदा पिकाचे प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर चर्चा केली. खटाव येथील राहुल काटकर व रजनीकांत शिंदे यांचे रोटाव्हेटर व बहुपिक थ्रेशरची यंत्रांची पाहणी करुन उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन मंडल कृषि अधिकारी सचिन लोंढे, कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे, कृषि सहाय्यक रुपाली पंडीत, किरण काळे, कुंडलिक जाधव, हरिदास भोसले, बाळासाहेब जगदाळे यांनी केले.