‘आजचे संशोधन हे यूजीसीचा फोर्स, बढती, नियुक्ती आदी कारणांसाठी केले जात असून, संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे, असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके, आयएसएसएन, आयएसबीएन अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर, पत्रिका काढल्या जात आहेत. एपीआय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात, तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे. भाषा कोणती रूपे धारण करते आहे, याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही, अशा संशोधन कर
जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात तसेच राज्यातही जवळजवळ सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 संबंधित विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या वैधतेच्या नूतनीकरणामध्ये देशातील व राज्यातील नागरिकांना तसेच वाहनमालकांना अडचणी येत आहेत. ज्या नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाच्या मुदती संपलेल्या आहेत, असे सर्व नागरिक व वाहनमालक देशातील तसेच राज्यातील विविध परिवहन
दारूची दुकाने सुरू केली पण मंदिरे बंद का? असा सवाल करत ‘दार उघड उद्धवा.. दार उघड व तिघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सातारा शहरातील अकरा मंदिरांसमोर तसेच पोवई नाक्यावर घंटानाद आंदोलन केले.
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावू लागल्याने सातारा जिल्ह्याची स्थिती गंभीर होवू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 669 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्याचा अडमूठेपणा करत आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधी आंदोलन करण्यात आले.
सातारा : कोरोनाची माहिती द्या आम्ही वैद्यकिय पथकातून आलो आहोत. असे सांगत घरामध्ये घुसून दरोडा टाकण्यासाठी पुण्यातून सातार्यात आलेल्या तिघांना सतर्क नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्यांचे इतर दोन साथीदार पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रविवार पेठेत घडली. गत दोन दिवसांपासून पाचजणांचे टोळके रविवार पेठेत संशयितरित्या फिरत होते. शुक...
सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत क्रिटीकल फेजवर आहे. संक्रमणाचा आतापर्यंतचा दर 18 टक्के आहे तर या आठवड्यातील दर तब्बल 22 टक्क्यांवर आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होईनासे झाले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. स्टेडियमवर चारशे बेडच्या जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र, त्यास विलंब योग्य नाही. सातारा जिल्ह्याच्या संवेदनशील मागण्यांना राज्य सरकारने तत्काळ मंजूरी द्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्व
सातारा जिल्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतीत झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात गुरुवारीदेखील तब्बल 575 बाधित आढळले तर बारा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 12,218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.