sports

सातारा जिल्ह्यात कोरोना क्रिटिकल फेजवर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ः सरकारकडून जिल्ह्याच्या मागणी विलंब अयोग्य

सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत क्रिटीकल फेजवर आहे. संक्रमणाचा आतापर्यंतचा दर 18 टक्के आहे तर या आठवड्यातील दर तब्बल 22 टक्क्यांवर आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होईनासे झाले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. स्टेडियमवर चारशे बेडच्या जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र, त्यास विलंब योग्य नाही. सातारा जिल्ह्याच्या संवेदनशील मागण्यांना राज्य सरकारने तत्काळ मंजूरी द्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्व

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत क्रिटीकल फेजवर आहे. संक्रमणाचा आतापर्यंतचा दर 18 टक्के आहे तर या आठवड्यातील दर तब्बल 22 टक्क्यांवर आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होईनासे झाले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. स्टेडियमवर चारशे बेडच्या जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र, त्यास विलंब योग्य नाही. सातारा जिल्ह्याच्या संवेदनशील मागण्यांना राज्य सरकारने तत्काळ मंजूरी द्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, दारुची दुकानं उघडताय तर मंदिरे उघडायला काय अडचण आहे असा सवाल ही फडणवीस यांनी केला. 
सातारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शुकवारी सातारा जिल्हा दौरा केला. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून कोविड संक्रमण व उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, उपस्थित होते.
फडणवीस यांनी दुपारी सव्वातीन वाजता जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन अतिदक्षता विभाग व सुसज्ज ऑपरेशन थिएटरला भेट दिली. रुग्णालयाची क्षमता 128 बेडची असताना 148 रुग्ण असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही रुग्णांना बेड मिळाले नव्हते त्याचा पाठपुरावा फडणवीस यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांच्याकडे केला. बाधित रुग्ण व मृतांची टक्केवारी व उपलब्ध सुविधा याचा आढावा फडणवीस यांनी घेत परिचारिका संघटनेशी संवाद साधला. एनआरएचएम व रिक्त वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मुद्दा डॉ. चव्हाण यांनी मांडला तेव्हा शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. वूमन्स हॉस्पिटलच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. सायंकाळी चार वाजता देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या दालनात त्यांच्याशी चर्चा केली. 
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले जिल्हा प्रशासनाने साधारण पन्नास कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. यानंतर त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णांची आस्थेने चौकशी केली. जिल्ह्याला दिलेल्या इंजेक्शनच्या चोरीबाबत ही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विचारणा केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विजय काटवटे, राहुल शिवनामे, ऍड.प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील, डॉ.उत्कर्ष रेपाळ, सचिन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दारू दुकानं उघडता, मग मंदिरांना काय अडचण
दारुचं दुकान उघडताय, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडताय आशा परिस्थितीत मंदिर उघडणे आग्रह असेल तर तो योग्य आहे. दारूची दुकाने उघडायला परवानगी देताय तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम असा रोकडा सवाल करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

जिल्हा रुग्णालयाच्या स्टाफची विचारपूस 
जिल्हा रुग्णालयात दररोज किती रुग्ण येतात, किती जणांना सेवा दिली जाते, किती जणांचा मृत्यू होतो किती बरे होतात याचा आढावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्याकडून घेतला.त्यांनी आस्थेने डॉक्टर, नर्स यांची विचारपूस केली.नर्स संघटनेने रिक्त जागा भरण्याची मागणी केली.