जिल्ह्यात दिवसभरात 619 कोरोनाबाधित
एकूण रुग्णसंख्या 13, 507 : उपचारादररम्यान 14 रुग्णांचा मृत्यू
कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सातारा : कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आणखी 332 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 322 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जावली तालुक्यातील 18, कराड 42, खंडाळा 3, खटाव 12, कोरेगाव 11, महाबळेश्वर 6, माण 10, पाटण 28, सातारा 164, वाई 28 अशा एकूण 322 जणांचा कोरोनामुक्तांचा समावेश आहे.682 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 18, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 71, फलटण 39, कोरेगाव 34, वाई 44, खंडाळा 75, रायगाव 32, पानमळेवाडी 85, मायणी 61, महाबळेश्वर 60, दहिवडी 8, खावली 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 130 अशा एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.


