सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विटद्वारे सांगितले असून दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी ट्विटद्वारे केले आहे.
कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!