कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावू लागल्याने सातारा जिल्ह्याची स्थिती गंभीर होवू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 669 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
सातारा ः कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावू लागल्याने सातारा जिल्ह्याची स्थिती गंभीर होवू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 669 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात 332 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 332 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये जावली तालुक्यातील 8, कराड 146, खंडाळा 7, खटाव 14, कोरेगाव 39, महाबळेश्वर 3, माण 13, पाटण 7, फलटण 26, सातारा 62, वाई 7 अशा एकूण 332 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.
533 जणांचे स्त्राव तपासणीला
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 66, फलटण 11, कोरेगाव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगाव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 104 अशा एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


