sports

जिल्ह्यात सर्वाधिक 575 कोरोनाबाधित


सातारा जिल्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतीत झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात गुरुवारीदेखील तब्बल 575 बाधित आढळले तर बारा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 12,218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

सातारा : सातारा जिल्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतीत झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात गुरुवारीदेखील तब्बल 575 बाधित आढळले तर बारा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 12,218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

आणखी 155 जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 155 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये जावली तालुक्यातील 1, कराड 27, खंडाळा 1, खटाव 5, कोरेगाव 12, महाबळेश्‍वर 14, माण 4, पाटण 13, फलटण 4, सातारा 67, वाई 7 अशा एकूण 155 जणांचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.

528 जणांचे स्त्राव तपासणीला 
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 26, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 59, फलटण 26, कोरेगाव 32, वाई 31, खंडाळा 45, रायगाव 28, पानमळेवाडी 48, मायणी 32, महाबळेश्‍वर 19, दहिवडी 33, खावली 24 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड 125 अशा एकूण 528 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.