Satara

esahas.com

भित्तीचित्र उद्घाटन प्रकरणी साताऱ्यात अकराजण ताब्यात

सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या भिंतीशिल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या परवानगी शिवाय केल्याप्रकरणी पुण्याचे मिलिंद एकबोटे आणि सातारा नगरपालिकेचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह पंचवीस ते तीसजणांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सातारा जिल्हयात गारठा वाढला

सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

esahas.com

जिंतीतील पित्याने मुलीच्या लग्नात केले लाख रुपयांच्या पुस्तकाचे कन्यादान

तालुक्यातील जिंती गावातील तांबे परिवारातील विवाह समारंभावेळी जयवंत तांबे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून तब्बल एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून देऊन आज समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिल्याने परिसरात हा कौतुकाचा कौतुकाचा विषय ठरला असून तांबे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

esahas.com

राजवाडा बसस्थानकावरील वादग्रस्त शिल्प तातडीने हटवा

राजवाडा बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांसमवेत असणारे रामदासांचे वादग्रस्त शिल्प प्रशासनाने तातडीने हटवावे अशी मागणी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनधिकृत शिल्पांची पोलिसांच्या उपस्थितीत उद़घाटने होतातच कशी ? प्रशासनाची या प्रकरणाला फूस आहे काय ? असा सवाल कोकाटे यांनी केला.

esahas.com

मलकापुरात लहान मुलगी व तिच्या आईला दगड मारून केले जखमी

कराड : मलकापूर, ता. कराड येथे घराच्या शेजारी लावलेल्या रिक्षावर ओरखडे ओढल्याचा राग मनात धरून लहान मुलीसह तिच्या आईला दगड मारून जखमी केले. सोमवारी 20 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी नयना युवराज गाडे (वय 28) रा. संस्कृती सिटी, मलकापूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अक्षय संजय कांबळे रा. जगदाळे मळा, मलकापूर असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहà¥...

esahas.com

उपकोषागार अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

esahas.com

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप

पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. भारत कमलाकर जाधव, वय २७,  रा. प्रतापगंज पेठ,  सातारा असे त्याचे नाव आहे.

esahas.com

वाईतील दोन बेपत्ता मुले आढळली पनवेलमध्ये

वाई शहरातील दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर वाईस सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती शाळांच्या आवारात मुलांची आणि काळजी घेण्याचे आवाहन वाई च्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने देखील केले होते या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, पण बेपत्ता झालेली ही दोन मुले पैसे संपल्यावर पनवेल मध्ये सापडली.

esahas.com

उंब्रज हद्दीतील दोन जण तडीपार

उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्याना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी एका वर्षा करीता सातारा व सांगली जिह्यातून हद्दपार केले आहे.

esahas.com

राजवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे लोकार्पण

सातारा येथील राजवाडा बसस्थानक परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांच्या वादग्रस्त शिल्पाचे आज येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक लोकार्पण करून त्यांच्या शिल्पावर दुग्धाभिषेक केला. शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्यासह बारा जणांना ताब्यात घेतले आहे.