तालुक्यातील सुरवडी गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील रस्ता अंत्यत खराब झाला होता. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून सोमवारी या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यामुळे सुरवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील रंगकर्मींचे हक्काचे स्थान असलेल्या शाहू कला मंदिराची तिसरी घंटा आज सायंकाळी वाजणार आहे. नुतनीकरणासह हे कलामंदिर नाट्यप्रयोग व कार्यक्रमांसाठी सज्ज झाले असून या नवीन वास्तूचा शुभारंभ सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी 22 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेरे ता. कराड येथे युवकाने राहत्या घरात फॅनच्या हुकाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम अशोक सातपुते (वय 22) रा. शेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवार १९ रोजी दुपारी 4.30 सुमारास उघडकीस ही घटना आली.
सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर कालव्याच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने लिंब आवळीमाथा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत लक्ष्मण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून अज्ञात ट्रॅक्टरचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सहा लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर प्रतिमहिना तीस हजार रुपयांचा परतावा देण्याची हमी दिल्यानंतर परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुंबईतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश बाळशिराम हाडवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सातारा येथील साई अमृत हॉस्पिटलच्या टेरेसवरुन साहित्य असलेल्या बॅगची चोरी झाली असून यामध्ये 61 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या बॅगेत सोन्या, चांदीचा ऐवज असल्याचे समोर आले आहे.
पुसेगाव : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना १३४ कोटी मंजूर केले. नेर तलाव्यात नुकतेच पाणी आले. त्या पाण्याचे पूजन भल्या पहाटेच करून मी'च पाणी आणले असल्याचा कांगावा करून श्रेय घेण्याचा केविलवाण प्रयत्न केला. मी या श्रेयवादात पडणार नसून येणाऱ्या काळात उत्तर खटावच्या भागात जिहे - कठापूरचे पाणी शेतकऱ्यांना पोहचवून दुष्काळी भागाà...
येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नगरपालिकेकडून 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
साताऱ्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवेंद्रराजें'च्या टिकेला उदयनराजें'नी सडेतोड उत्तर देत टीका केली.