maharashtra

सुरवडीतील रेल्वे क्रॉसिंगच्या डांबरीकरण कामास आरंभ

खासदार रणाजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पाठपुरावा : ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

Commencement of asphalting work of Survadi railway crossing
तालुक्यातील सुरवडी गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील रस्ता अंत्यत खराब झाला होता. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून सोमवारी या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यामुळे सुरवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फलटण : तालुक्यातील सुरवडी गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील रस्ता अंत्यत खराब झाला होता. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुरावा करण्यात आल्यानंतर खासदार निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले असून सोमवारी या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यामुळे सुरवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुरवडी गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे ॅकवरील रेल्वे क्रॉसिंगदरम्यान असलेला रस्ता अंत्यत खराब झाला होता. यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. वाहनधारक तसेच नागरिकांकडून या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली होती.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून या रस्त्याच्या डांबरीकरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर तातडीने कार्यवाही होवून सोमवारी सुरवडी येथाल रेल्वे क्रॉसिंगचे 700 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. याबद्दल प्रल्हादराव साळुंखे -पाटील, जितेंद्र साळुंखे - पाटील यांच्यासह सुरवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार व्यक्त केले असून रस्त्याचे काम मार्गी लावल्याने समाधान व्यक्त केले आहे.