maharashtra

उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू


Two-wheeler driver died after hit by sugarcane trolley
सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर कालव्याच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने लिंब आवळीमाथा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत लक्ष्मण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून अज्ञात ट्रॅक्टरचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्यावर कालव्याच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने लिंब आवळीमाथा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरत लक्ष्मण सावंत असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून अज्ञात ट्रॅक्टरचालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संजय रामचंद्र सावंत (वय 24, रा. लिंब आवळीमाथा, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत रस्त्यावर अज्ञाताने दि. 18 रोजी सायंकाळी उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर (एमएच 45 - एफ 2698) वाहतूकीस अडथळा होईल, अशाप्रकारे रस्त्यावरच उभा केला होता. याच मार्गावरुन भरत लक्ष्मण सावंत (वय 50, रा. लिंब, आवळीमाथा, ता. सातारा) हे दुचाकीने (एमएच 11 - सीडी %060) निघाले होते. मात्र, त्यांची दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यात भरत यांचा अपघात झाला. त्यांच्या चेहर्‍याला आणि डोळ्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.