मी श्रेयवादात पडणार नाही : आ. शशिकांत शिंदे
जिहे- कठापूरचे पाणी शेतकऱ्यांना पोहचवून शेतकरी बागायतदार व्हावेत
पुसेगाव : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे - कठापूर योजनेसाठी मी जलसंपदामंत्री असताना १३४ कोटी मंजूर केले. नेर तलाव्यात नुकतेच पाणी आले. त्या पाण्याचे पूजन भल्या पहाटेच करून मी'च पाणी आणले असल्याचा कांगावा करून श्रेय घेण्याचा केविलवाण प्रयत्न केला. मी या श्रेयवादात पडणार नसून येणाऱ्या काळात उत्तर खटावच्या भागात जिहे - कठापूरचे पाणी शेतकऱ्यांना पोहचवून दुष्काळी भागातील शेतकरी बागायतदार व्हावेत, असे प्रतिपादन माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
राजापूर, ता. खटाव येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या फंडातून १० लाख रुपये दिलेल्या दत्त मंदिर सभामंडपाचे उद्घाटन व जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. सुनिता कचरे यांच्याफंडातून पाण्याची टाकी व पाईपलाईनचे उद्घाटन आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिता कचरे, बुधचे माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, माकॅट कमिटीचे संचालक राजेंद्र कचरे, डिस्कळचे सरपंच डॉ. महेश पवार , राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर जगताप, माजी सरपंच राजेंद्र घाटगे, पांडुशेठ गोडसे, सुनिता घनवट, सरपंच वनिता पवार, उपसरपंच रविंद्र घनवट, माजी सरपंच हणमंत घनवट, काकासाहेब डंगारे, नारायण घनवट आदी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले की, राजापूर येथे जलसंधारणाची कामे भरपूर झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही. राजकारणात मोठेपणा असावा लागतो. खटाव व माणला पाणी जात असताना माझ्यावर अनेकांनी टिका केली. पण मला कुणाचे पाणी आडवायचे नाही. मांजरवाडी, राजापूर भागाला पाणी येऊन हरितक्रांती झालीच पाहिजे. या परिसराला पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. खटाव व माण यादुष्काळी भागातील मुलांच्यामध्ये जिद्द व चिकाटी असल्यामुळे या भागातील तरूण-तरुणी अधिकारी होत आहेत.
डिस्कळ ची सुकन्या रुपाली कर्णे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रसंगी मोबाईलवर अभ्यास करून भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत उज्वल यश संपादन केले. या दोन तीन वर्षात कोणताही पेपर फुटल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे अफाट कष्ट करणाऱ्या तरुण - तरुणींच्यावर अन्याय होत आहे. राजकारणात या भागातील जनता माझ्यावर भरभरून प्रेम करून आशिर्वाद देतात, हे माझे भाग्य आहे. याचा मला अभिमान असून चांगली माणसे हीच माझी पुंजी आहे. येणाऱ्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डिस्कळ, ता खटाव येथील सुकन्या रूपाली दशरथ कर्णे हीने युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत संपूर्ण भारतात पाचवा क्रमांक आल्या बद्दल व राजापूर गावचे सुपुत्र व लोणंद पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे अभिजित घनवट यांचा सत्कार आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामचंद्र घनवट, रामदास डंगारे, समीर सय्यद, सुवर्धन जगदाळे, शाम कर्णे, बळीराम डंगारे, सुभाष घनवट, बाळासाहेब डिसले, जालिंदर घनवट, दशरथ घनवट, नागेश घनवट, वैशली घनवट, जगन्नाथ घनवट, संजय घनवट, चंद्रकांत पालकर व सहकार मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाकार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल घनवट यांनी केले. प्रास्तविक रणजित घनवट यांनी केले तर आभार संतोष घनवट यांनी मानले.