सातारा येथील साई अमृत हॉस्पिटलच्या टेरेसवरुन साहित्य असलेल्या बॅगची चोरी झाली असून यामध्ये 61 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या बॅगेत सोन्या, चांदीचा ऐवज असल्याचे समोर आले आहे.
सातारा : सातारा येथील साई अमृत हॉस्पिटलच्या टेरेसवरुन साहित्य असलेल्या बॅगची चोरी झाली असून यामध्ये 61 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या बॅगेत सोन्या, चांदीचा ऐवज असल्याचे समोर आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रेखा प्रवीण साळुंखे (वय 45, रा. मोहितेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी शनिवार, दि. 18 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास साहित्याची बॅग साई अमृत हॉस्पिटलच्या टेरेसवरती ठेवली होती. या बॅगमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची चेन, टोपी, रुमाल, स्वटेर आणि जेवणासाठी लागणारी भांडी होती. हे सर्व चोरीला गेले आहे. चोरीला गेलेले मंगळसूत्र अडीच तोळे वजनाचे असून त्याची किमंत 60 हजार तर चांदीच्या चेनची किमंत एक हजार रुपये असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


