‘वासुदेव आला हो... वासुदेव आला..., सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो..., वासुदेव आला... हे गाणं ऐकले की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभे राहते.
जाणुन घ्या लाईट बिला संबंधित तुमचे अधिकार; अन्यथा तुमची अशीच लूट होईल..! वीज ही आपली गरज आहे आणि ती आपण त्यानुसार वापरतो. तसेच आपण त्याचे बिलही भरतो. गेल्या काही दिवसांपासून लाईटबिल भरपूर आले आहे. लाइटबिल चे रीडिंग कमी असले आणि तुम्ही वापरत असलेले युनिट देखील कमी असले तरीही, लाइटबिल हे जास्त उकळले जाते आणि याला आपणच जबाबदार देखील आहोत.
सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. शुभम दीपक कडव आणि अनमोल महेंद्र कांबळे अशी अटक केलेल्याची नावे आहेत. एलसीबीने या दोघांनाही अधिक चौकशीसाठी मेढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार असून सातारा जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजान करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी यांनी दिली.
सातारा विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सातारा शहरात अनेक बदल करण्यात आले. जगाबरोबरच सातारा शहरालाही कोरोनाचा मुकाबला करावा लागल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना नगरसेवकांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याही परिस्थितीत कोरोना बाधित नागरिकांना सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात दिला.
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर कोरोना संसर्गाचा आलेख सध्या अल्पवाढीत देखील थोडा खालीवर होताना दिसत असला तरी सातारा जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आलेली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतलेला असून जिल्ह्यात तब्बल 35 लाख 76 हजार 991 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील १४ प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश असणार असल्याची माहिती विभागीय पर्यटन कार्यालय पुणेच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांनी दिली आहे.