सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण, ता. फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या जवळ असलेल्या कंपाऊंडच्या भिंतीच्या आडोशाला दिलीप केशव नाळे, वय ५१, रा. धुळदेव, ता. फलटण याच्याकडून १२०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. केसुर्डी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत जॉली कंटेनर कंपनीच्या पाठीमागे चांद मेहबूब शेख, रा. खंडाळा याच्याकडून पाचशे रुपये किमतीची हातभट्टीची दारू हस्तगत करण्यात आली. तिसऱ्या घटनेत पेठ शिवापूर ता. पाटण गावच्या हद्दीत नवनाथ पांडुरंग मोरे रा. गोकुळ, तालुका पाटण याच्याकडून १ हजार ५२५ रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. शिंगणापुर ता. माण गावच्या हद्दीत पान टपरीच्या आडोशाला यांच्याकडून महादेव शामराव घाडगे, रा. शिंगणापुर याच्याकडून ७२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
माळ्याचीवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत गोठ्याच्या शेडच्या आडोशाला तेथीलच रमेश दिनकर दुदुस्कर, तुषार शंकर कापसे यांच्याकडून १ हजार ८०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
शेवरी, ता. माण गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच विजय निवृत्ती सावंत याच्याकडून ६९० रुपये किमतीची देशी दारू हस्तगत केली. पुसेसावळी, ता. खटाव गावच्या हद्दीत पानपट्टीच्या आडोशाला संतोष महादेव घाडगे, रा. लाडेगाव, ता. खटाव यांच्याकडून १ हजार ८० रुपये किमतीची देशी दारू हस्तगत केली. कराड येथे बैल बाजार ते मलकापूर जाणाऱ्या मार्गावर पेट्रोल पंपाच्या समोर झाडाच्या आडोशाला मलकापूर येथील गणेश सोमनाथ पुजारी याच्याकडून १ हजार ४४० रुपये किमतीची देशी दारू हस्तगत केली.


