maharashtra

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी


Six persons were injured in five accidents at different places in the district
जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सत्यवान रामचंद्र कारंडे, वय 47,  रा. पळशी, ता. खटाव यांचा दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या शिवारात तेथीलच शेतामध्ये दुचाकी घसरून अपघात झाला. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसर्‍या घटनेत विनायक सोपान केंगार, वय 30, रा, आसुद, ता. पलूस आणि निलेश भास्कर तुपे, वय 23, रा. मुंडे, ता. कराड हे दि. 20 रोजी रात्री पिकअप गाडी घेऊन पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना उंब्रज गावच्या हद्दीत पिकअप गाडीला अपघात होऊन दोघे जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिसर्‍या घटनेत अविनाश अशोक कदम, वय 14, रा. व्यंकटपुरा, सातारा हा दुचाकी चालवत असताना दुचाकीवरून तोल जाऊन पडून जखमी झाल्याची घटना घडली. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौथ्या घटनेत सुनील हणमंत चांगण, वय 30, रा. सासकल, ता. फलटण हा दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून फलटण येथून सासकलकडे जात असताना सासकल गावच्या हद्दीत दुचाकीचा चार चाकी वाहनास समवेत अपघात झाल्याने झालेल्या दुर्घटनेत जखमी झाला. त्याच्यावर प्रथम फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पाचव्या घटनेत महेश रमेश सपकाळ, वय 80, रा. कोयना सोसायटी, सातारा हेच आपल्या दुचाकीवरून शिवराज ढाबा ते खिंडवाडी सेवा रस्त्याने जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात होऊन त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.