विरमाडे, ता. सातारा गावच्या हद्दीतून शिवारात पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कुर्ला, मुंबई येथील एका विवाहित महिलेला मुल होण्यासाठी एकाने वाई, जि. सातारा येथील आपल्या बहिणीच्या घरी तसेच यवतमाळ, जि. यवतमाळ येथील चुलत्यांच्या घरी घेऊन जात आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून विठ्ठल गणपत पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा विकास आघाडीने त्रिशंकू भागामध्ये समत्व भावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाई (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसिल कार्यालय खटावच्या वडूज पुरवठा शाखा व ग्रामपंचायत डिस्कळ यांच्या संयुक्त विद्यमाने. महा राजस्व अभियानांतर्गत डिस्कळ येथे 374 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
अद्ययावत सुविधांनी युक्त आणि रंगकर्मीचे हक्काचे व्यासपीठ असणारे शाहू कला मंदिर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले. येथील सुविधांसह नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कोविड-19 मुळे दोन्ही पालक/एक पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय हक्क व इतर लाभ देण्याकरीता जिल्हास्तरीय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स ) ची बैठक अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काटेवाडी, ता. खटाव येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने आनंदवन बिनभिंतीची शाळा सुरु केली आहे. संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुसेगाव येथील मुलाणी यांच्या वीटभट्टीवर ही शाळा सुरु करण्यात आली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
कोरोनाच्या संकटातून नागरीक सावरत असताना पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. या महागाईच्या झळा जीवनावश्यक बनलेल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लानच्या दरात मोठी वाढ केल्याने महिनाभराच्या केवळ इन्कमिंग कॉलसाठी 100 रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.