जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने दि. २१ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२१ दरम्यान अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरुन नेल्याची तक्रार पवनचक्की कंपनीचे अधिकारी दीपक वसंत घाडगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली.


